^^^^^^
खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत
वाशिम: खरीप हंगाम जोरावर असताना जिल्ह्यात व खतांचा तुडवडा निर्माण झाला आहे. आधीच सततच्या पावसामुळे संकटात सापडलेली पिके आता सावरत असताना खताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
------------------
पथदिवे दुरुस्तीची मागणी
वाशिम: पावसाळा निम्मा उलटला तरी तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेऊन गावातील नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
^^^^^^^^^^^^^^^
लोंबकळत्या तारांकडे दुर्लक्ष
वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही महावितरणकडून मान्सूनपुर्व दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. वाशिम तालुक्यात मात्र वीज तारांवर चढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासह इतरही विविध कामे अद्याप प्रलंबितच आहेत.
--------
वन्यप्राण्यांनी फस्त केले पीक
वाशिम: तालुक्यात खंडाळा खु. परिसरात खरीप पिकांवर वन्य प्राणी ताव मारत आहेत. त्यात दोन शेतकऱ्यांच्या शेतामधील शेंगधारणेवर आलेल्या मुगाच्या पिकाचा हरीण आणि नीलगाईच्या कळपांनी फडशा पाडला.
^^^^
रस्त्याची अवस्था वाईट
वाशिम: वाशिम ते पुसद महामार्गावरील दगड उमरा फाट्यानजिक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे. यातून एखादवेळी मोठा अपघात घडून जीवित हानी होण्याची भीती आहे.