लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : वाशिम तालुका संपूर्णता दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात यावा व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतक-यांना देण्यात यावा अशी मागणी वाशिम पं.स.चे सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाष चौधरी यांनी दिलेल्या निवेदनातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी वाशिम व कृषी मंत्रीर् यांना पाठविल्या आहेत.सन २०१६ -१७ चे खरीप पिकांना आवश्यक तेवढा पाऊस न पडल्याने वाशिम तालुक्यामध्ये मुख्य पिक असणाºया सोयाबीन तुर, कपाशीचे उत्पन्न घटले, सोयाबीन एकरी १० क्विंटल ऐवजी २ ते ३ क्विंटल एव्हेडच पिकल्याने तसेच कपाशी तुर ही पिके धोक्यात आल्याने शेतकºयांचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये महसुल प्रशासनाने इंग्रज कालीन आणेवारी पध्दती वापरुन पिक आणेवारी ही नजर अंदाजे ५० टक्क्यापेक्षा जादा दाखवुन शेतकºयांवर सुलतानी संकट लादले आहे. त्यामुळे ही आणेवारी पध्दती खारीज करुन वाशिम तालुका दुष्काळग्रस्त म्हणुन घोषीत करावा व पिकांचे पंचनामे करुन तात्काळ प्रधानमंत्री पिक विम्याचे वाटप करण्याचे आदेश महसुल प्रशासनाला द्यावेत अशी मागणी वाशिम पं.स.चे सभापती गजानन भोने ,उपसभापती मधुबाला सुभाष चौधरी, यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
वाशिम तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करुन पिक विम्याचे वाटप करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 8:28 PM
वाशिम : वाशिम तालुका संपूर्णता दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत करण्यात यावा व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतक-यांना देण्यात यावा अशी मागणी वाशिम पं.स.चे सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाष चौधरी यांनी दिलेल्या निवेदनातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देवाशिम पं.स. सभापती भोने यांची मागणी जिल्हाधिका-यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन