कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. दुसरीकडे सर्वांचीच आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने शेतकऱ्यांना आधार द्यायला कोणी तयार नाही. अशा स्थिती गोपाल पाटील राऊत यांनी स्वतःच्या मिळकतीतून ७ लाख २० हजार रुपये गुंतवून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर हनवतखेडा येथील शेतकऱ्यांना ६०० बॅग डीएपी खताचे वाटप केले. यावेळी श्री विठ्ठल कृषी सेवा केंद्राचे संचालक अशोकराव नवघरे, कृषी विभागाचे मापारी, सरपंच सुनील पाटील राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भगत, अरुण रहाणे, उमेश राऊत, शुभम राऊत, माणिकराव राऊत, सदाशिव टाले, राजाराम वानखेडे, विष्णू भगत, बनसाबाई भगत, रवि भगत, सदाशिव चाले आदी उपस्थित होते.
दरम्यान, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना गोपाल राऊत यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाची तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे.