लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय स्तरावर विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी २७ जुलै रोजी वाशिम येथील आढावा बैठकीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमार्फत शालेय स्तरावर विशेष शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर तहसील कार्यालयांत विविध कागदपत्रे काढण्यासाठी अगोदरच गर्दी असते. या दरम्यान मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी लागणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गर्दी टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सदर प्रमाणपत्रे व दाखले एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याची मागणी शाळांनी करणे अपेक्षीत आहे. शाळांच्या मागणीनुसार शालेयस्तरावर महाराजस्व अभियानांतर्गत दाखले वाटप शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमार्फत संबंधित शाळांमध्ये प्रमाणपत्र वितरणासाठी शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.
विविध प्रमाणपत्रांचे होणार शालेयस्तरावर वाटप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 7:33 PM
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शालेय स्तरावर विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी २७ जुलै रोजी वाशिम येथील आढावा बैठकीत केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयांमार्फत शालेय स्तरावर विशेष शिबिरांचे नियोजन केले जाणार आहे.मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. दहावी व ...
ठळक मुद्देमहाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार सुविधा