शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

   मानोरा तालुक्यात १२० धान्य दुकानातून ई पॉश मशीनव्दारे धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:32 PM

मानोरा : तालुक्यातील १२० शासकीय रास्तभाव धान्य दुकानातून शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण बायोमेट्रीक प्रणाली म्हणजेच ई पॉश मशिनच्या आधारे वितरण करण्यात येत आहे .

ठळक मुद्देबायोमेट्रीक प्रणालीमुळे धान्य वितरणात पारदर्शकता प्रति क्विंटल दहा रुपये वाढीचा परिणाम

मानोरा : तालुक्यातील १२० शासकीय रास्तभाव धान्य दुकानातून शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण बायोमेट्रीक प्रणाली म्हणजेच ई पॉश मशिनच्या आधारे वितरण करण्यात येत आहे . त्यामुळे वितरण धान्य प्रणालीत पारदर्शकता आली आहे तसेच बायोमेट्रीक प्रणालीव्दारे वितरीत केलेल्या धान्य वितरणाच्या मार्जीनमध्ये रास्त भाव परवानाधारकांना शासनाने प्रति क्विंटल १० रुपये वाढ केल्यामुळे परवानाधारक सुद्धा पॉस मशिनने शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण करीत आहे.

राज्य शासनाने गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या हक्काचे धान्य पोहचावे व सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी अन्नधान्य वितरण व्यवस्थेत बायोमेट्रीक प्रणालीच्या विलंब केला, त्यानुसार पहील्या टप्यात भारतीय अन्न मंडळाकडून धान्य उचालून त्याचे शासकीय  गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे  सनियंत्रण करण्यात आले. त्यानंतर दुसºया टप्प्यात सर्व शिधावाटप कार्याल्यातील कामाचे संगणीकरण व लाभार्थी कुटूंबाला संगणीकृत शिधात्रीका देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली कुटूंबातील वरिष्ठ महिलेच्या नावे संगणीकृत शिधापत्रीकेचे वितरण करण्यात आले यामध्ये कुटूंबातील सर्व व्यक्तींच्या आधार क्रमांकाचा समावेश करण्यात आला. 

मानोरा तालुक्यात १२० रास्त भाव धान्य दुकान आहे. बायोमेट्रीक प्रणालीमध्ये लाभार्थी धान्य घेण्यासाठी  शासकीय रास्त भाव धान्य दुकानात  आल्यानंतर त्याला अंगठा पॉश मशीनवर ठेवून खात्री करावी लागते. अंगठाचा ठसा दिल्यावर लाभार्थीच्या संपूर्ण तपशिल पॉस मशिच्या स्क्रीनवर दिसतो . घ्यायची रक्कम, धान्य या बाबतची संपूर्ण तपशीलची पावती प्रिंट स्वरुपात मशिनमधून बाहेर पडते . सदर पावतीच्या आधारे रास्त भाव परवानाधारक धान्य वितरीत करतो अशा पद्धतीने ईपिडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होते. तालुक्यातील प्रत्येक शासकीय धान्य दुकानात अन्नधान्य विरतण सुरु झाले आहे. बायोमेट्रीक प्रणालीव्दारे म्हणजेच मशिनव्दारे वितरीत केले त्या धान्य वितरणाच्या मार्जिनमध्ये प्रति क्विंटल १० रुपये वाढ करण्यात आली आहे. पुर्वी हे मार्जीन केवळ प्रति क्विंटल ७० रुपये एवढे होते त्यात वाढ करुन ८० रुपये मार्जिनमधील वाढ ही केवळ बायोमेट्रीक पद्धतीने वितरीत होणाºया धान्य वितरणासाठीच लागू असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे. 

टॅग्स :Marketबाजार