लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : शहर सफाईदरम्यान सदोदित घाणीचा सामना कराव्या लागणाºया सफाई कामगारांचे स्वास्थ्य चांगले राहावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मालेगावच्या नगराध्यक्ष रेखा बळी यांच्या पुढाकारातून नगर पंचायतीने बुधवार, १२ डिसेंबर रोजी त्यांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण करण्याचा उपक्रम राबविला. शहरातील गटारे, नाल्यांची साफसफाई करताना सफाई कामगारांच्या आरोग्याला बाधा पोहचू नये, यासाठी त्यांना विशेष असा गणवेश, जॅकेट, हातमोजे, तोंडाला लावला जाणारा मास्क, पादत्राणे यासह अन्य स्वरूपातील आवश्यक साहित्य नगराध्यक्ष बळी व मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरूण बळी, उपनगराध्यक्ष संतोष जोशी, बबनराव चोपडे, माजी नगराध्यक्ष मिनाक्षी सावंत, सभापती शीतल खुळे, नगरसेवक गजानन सारसकर, मदन राऊत, सुषमा सोनोने, रामदास बळी, ज्योती राऊत, किशोर महाकाळ यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. संतोष बग्गन, सतीश देवकते, लखन खोडे, गजानन गायकवाड, अंकुश ऊफाडे, सागर पवार, रवी देवकते, परमेश्वर खडसे, गणेश गायकवाड, कमलेश कोली, प्रमीला नोयल यांच्यासह अन्य सफाई कामगारांना याप्रसंगी स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधिक्षक पल्लवी शेळके, पाणी पुरवठा अभियंता सतीश शेवदा, सतीश महाकाळ, रवी शर्मा आदिंनी पुढाकार घेतला.
मालेगावात सफाई कामगारांना स्वास्थ्य सुरक्षा कीटचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 3:54 PM