मानोरा (वाशिम) : शालेय शिक्षण व क्रिडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी आणि आप्पास्वामी शिक्षण संस्था शेंदुरजना अढाव यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार पार पडला.यावेळी आप्पास्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, राज्य क्रिडा मार्गदर्शक किशोर बोंडे, विजय मोटघरे, प्रदीप देशमुख, शेख अब्दुल, पवार, श्यामभाऊ वानखेडे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रथम क्रमांक १९ वर्ष वयोगटामध्ये भारत माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय रिसोड तर उपविजेता जि.प.विद्यालय, कामरगाव संघ ठरला. १७ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक भारत माध्यमिक कन्या शाळा रिसोड, उपविजेता संघ नाथ विद्यालय, मंगरुळपीर तसेच १४ वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक विद्याभारती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय वाशिम तर उपविजेता संघ जि.प.शाळा कामरगाव संघ ठरला. या सर्व विजयी संघाला आप्पास्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काळे तसेच राज्य क्रिडा मार्गदर्शक बोंडे यांनी पदक देऊन सन्मानित केले. या दोन दिवशीय व्हॉलीबॉल सामन्याचे पंच म्हणुन अभय बाबरे, दिपक वानखडे, सलमान पप्पुवाले, युसुफ मुन्नीवाले यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्रीडा शिक्षक प्रा.जी.एस.इंगोले, प्रा.सतिश काळे, प्रा. प्रविण रंगे, प्रा.राजेंद्र आ.काळे, प्रा.देवचंद साबळे, प्रा.एस.डी. सातपुते, प्रा.एन.बी. आहेरकर, प्रा.वैशाली उगले, सरोदे, नागरे, प्रा. जी. एम. घुले, प्रा. अळसपुरे, प्रा. जे.टी. नाचणे, प्रा.व्ही. टी. आरु, गौतम खिराडे, महादु ब्राम्हण, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. संचालन प्रा.सतिश काळे तर आभार प्रा.जी.एस.इंगोले यांनी मानले.
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:10 PM