अन्न व नागरी पुरवठा विभागाने उपलब्ध करून दिलेली पोर्टेबिलिटीची सुविधा रेशन कार्डधारकांसाठी सोयीची झाली आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांना अथवा काही नागरिकांना बदली किंवा रोजगारासाठी दुसऱ्या गावात राहण्यासाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना रेशनकार्ड पोर्टेबिलिटीमुळे आपले रेशनकार्ड त्या दुकानाशी जोडून स्वस्त धान्याची उचल करता येत आहे. त्यामुळे ही सुविधा निश्चितच रेशन कार्डधारकांसाठी सुविधेची ठरत आहे. त्यात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रेशनकार्ड पोर्टेबिलिटीचा लाभ रेशन कार्डधारकांनी अधिक घेतला आहे.
...............
शहरात जास्त बदल
- रेशनकार्ड पोर्टेबिलिटीच्या सुविधेचा लाभ शहरातील २ हजारांहून अधिक रेशन कार्डधारकांनी घेतला आहे. म्हणजेच शहरी भागात जास्त बदल असून, ग्रामीण भागात या सुविधेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे.
- शहरी भागातील नागरिकांना रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधेची माहिती आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य वितरणात त्रास होत असल्यास ते त्वरित या सुविधेचा लाभ घेत आपले रेशनकार्ड दुसऱ्या दुकानाशी जोडून घेतात.
- ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांना या सुविधेची अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे ते या भानगडीत पडत नाहीत.
................
नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार गेला, तर ग्रामीण भागातील हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची दोनवेळच्या जेवणासाठी मोठी अडचण झाली. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अंत्योदय व बीपीएल लाभार्थींना नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. याचा जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ९५३ रेशन कार्डधारकांना लाभ मिळणार आहे.
............
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक : २,४९,९५३
कितीजणांनी बदलला दुकानदार : ४,७२२
.................
बीपीएल : १,७१८
अंत्योदय : २,१८९
केशरी : १,०४६
...................
काेणत्या तालुक्यात कितीजणांनी घेतला पोर्टेबिलिटीचा लाभ
कारंजा : ७५५
मालेगाव : १२३९
मंगरुळपीर : १०४२
मानोरा : ५४९
रिसोड : ४८७
वाशिम : ६५०
............................