वाशिम : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजनेमधून सन २0१५-१६ साठी वितरीत करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यलयात २७ ऑगस्ट रोजी आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. जी. वाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. खांडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ज्ञानेश्वर खाडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजनेमधून विभागनिहाय वितरीत झालेल्या निधीची माहिती घेतली. जिल्हा नियोजन अधिकारी गवळी यांनी वितरीत निधी व खर्च निधी याविषयीची आकडेवारी सांगितली. तसेच अद्यापही काही यंत्रणांकडून प्रस् ताव सादर करण्यात आले नसल्याचे सांगितल्यावर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा आढावा
By admin | Published: August 28, 2015 12:10 AM