मानोरा : दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक २० फेब्रुवारीला होत आहे. त्याकरिता तीन ही उमेदवार फिल्डिंग लावत आहेत.
जिल्हा बँकेत तीन उमेदवार उभे आहेत. विद्यमानआमदार राजेंद्र पाटणी यांचे गटाकडून विद्यमान संचालक उमेश पाटील ठाकरे, माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी आपल्या गटाकडून तुषार पाटील इंगोले तर माजी आमदार प्रकाश डहाके यांचेकडून माजी संचालक सुरेश गावंडे रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सुभाष ठाकरे व प्रकाश डहाके यांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढविली होती, आता मात्र हे दोन नेते एकमेकासमोर आहेत. मतदार अज्ञात ठिकाणी रवाना झाले आहे . त्यामुळे जिल्हा बँकेच्या मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरविंद पाटील इंगोले यांचे चिरंजीव तुषार पाटील तर उमेश ठाकरे ताकदिने भिडले आहेत. राजकीय घडामोडीत तालुक्यातील ३४ मतदारात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. राजकीय घडामोडीत ही निवडणूक अटीतटीच्या प्रसंगात आली आहे. दोन्ही माजी आमदार व विद्यमान आमदार यांचे करिता ही निवडणूक प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. मानोरा येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वसंतनगर येथे शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.