शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
4
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
6
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
7
शत्रूला शोधून करणार खात्मा, रोबोटिक श्वान का आहे खास?
8
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
9
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
10
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
11
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
12
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
13
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
14
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
15
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
16
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
17
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
18
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
19
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
20
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट

सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात

By नंदकिशोर नारे | Published: June 07, 2024 11:26 AM

तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहाथ पकडले.

नंदकिशोर नारे, वाशिम :   प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल)  अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी   जिल्हा उपनिबंधक वर्ग १,  सहकारी संस्था वाशिमचे दिग्विजय राठोड यांनी ९ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील उर्वरित ६ लाख रुपयाची लाच स्वीकारताना अकोला एसीबी पथकाने  ६ जून रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तिरुपती सिटी वाशिम येथे रंगेहाथ पकडले.

मंगरूळपिर येथील तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचा   अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी  राठोड यांनी ९ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान तक्रारदार याने त्यामधील २ लाख ५० हजार रुपये अगोदरच  दिले होते.  उर्वरित राहिलेले पैसेसाठी तकादा लावल्या जात असल्याची तक्रार  तक्रारदार यांनी ४ रोजी अकोला येथील अँटी करप्शन ब्युरो येथे  दिली.  

नमूद तक्रारीच्या अनुषंगाने  ६ जून  रोजी पडताळणी कारवाई केली . यावेळी आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास ६ लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून ६ जून रोजी  रात्री  तिरुपती सिटी  येथील सिल्व्हर अपार्टमेंट मध्ये त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी  सापळा रचला व राठोड यांना रंगेहाथ पकडले . त्यांना  ताब्यात  घेण्यात आले . 

सदरची कारवाई अकोला एसीबी पथकातील पोलिस निरीक्षक सचिन सावंत, यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार  यांनी यशस्वीरीत्या केली .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण