शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ आॅगस्टला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 2:05 PM

आॅगस्ट २०१९ महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, ५ आॅॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आॅगस्ट २०१९ महिन्यातील लोकशाही दिन सोमवार, ५ आॅॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करून किमान ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही तक्रार निकाली निघाली नसल्यास संबंधितांना सप्टेंबर महिन्याच्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकरिता तक्रार दाखल करता येईल. याकरिता विहित नमुन्यातील अर्जासह तालुका लोकशाही दिनातील तक्रारीचा टोकन क्रमांक व दिनांक व आवश्यक कागदपत्रे जोडून दोन प्रतीत तक्रार अर्ज दाखल करावा. जिल्हास्तरावर अर्ज करताना तहसीलदार याचे उत्तरासह तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रति न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या नागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या सभेत हजर राहण्याचे पत्र मिळाले आहे व जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आतापर्यंत ज्यांच्या तक्रारी निकाली निघाल्या नाहीत, अशाच नागरिकांनी ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या लोकशाही दिनास उपस्थित रहावे. अर्जदार गैरहजर राहिल्यास प्रकरण वगळण्यात येईल. ज्या नागरिकांनी ई-लोकशाही कक्षामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ५ आॅगस्ट रोजी होणाºया लोकशाही दिनात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. लोकशाही दिनामध्ये विहित नमुन्यातील अर्जाद्वारे तक्रार सादर करणे आवश्यक आहे. या अजार्चा नमुना लोकशाही कक्षात विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. लोकशाही दिनात दाखल करावयाची तक्रार ही वैयक्तिक स्वरुपाची असावी, सार्वजनिक स्वरुपाची तक्रार लोकशाही दिनामध्ये दाखल करता येणार नाही. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व प्रकरणे, अपील, सेवाविषयक,आस्थापनाविषयक तक्रार लोकशाही दिनात स्वीकारली जाणार नाही. असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. ई-लोकशाही दिनात आॅनलाईन तक्रार दाखल करता येणार!पीक कर्जे, पंचायत समिती, तहसील कार्यालय, कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार, शिष्यवृत्तीविषयक, भ्रष्टाचारविषयक, नगरपरिषदसह इतर शासकीय-निमशासकीय कार्यालयाच्या संबंधित तसेच सार्वजनिक विषयाच्या तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सुविधा ई-लोकशाही कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागरिक ८३७९९२९४१५ या व्हॉटसअप क्रमांकावर किंवा ईलोकशाहीवाशिम@जीमेल डॉट कॉम या ई-मेलवर तसेच ०७२७५-१०७७ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिम