लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महिलांशी संबंधित कायदा साक्षरता व दैनंदिन जिवनात भेडसावणाºया महिलांच्या समस्या अधोरेखित करण्यासह महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण या विषयावर शुक्रवार २६ आॅक्टोबर रोजी कृषी विज्ञान केंद्र करडाच्या पुढाकारातून वाशिम येथे कार्यशाळा घेण्यात आली.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेखा खोत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, कृषी विज्ञान कें द्रातील तज्ज्ञ आर. एस. डवरे व एस. के. देशमुख आदि मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. काळे यांनी कार्यशाळेच्या आयोजना उद्देश स्पष्ट करताना कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे विश्लेषण केले. आर. एस. डवरे यांनी कृषीमध्ये महिलांचा सहभाग या विषयावर विस्तृत विवेचन केले. प्रमुख मार्गदर्शक सुरेखा खोत यांनी स्वंयपूर्ण ग्रामपंचायत राज व्यवस्थेत चिरकाल विकास, पारदर्शकता, दारूबंदी चळवळ करून समाधानी, सुखी संसाराची वाटचाल या विषयी विचार व्यक्त केले. जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी महिलांचे पंचायत राज सक्षमीकरणासाठी कर्तव्य व भूमिकेवर विचार मांडतानाच वाचनाचे फायदे व निर्णय क्षमतेत झालेली वाढ यावर प्रकाश टाकताना महिलांनी चिकित्सक बुद्धीचा वापर करून स्वालंबी बनण्याचे आवाहन केले. पिंप्री मोडकच्या सरपंच ललिता थोटांगे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. सूत्र संचालन शुभांगी वाटाणे यांनी तर आभार प्रदर्शन एस. के. देशमुख यांनी केले.
‘महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण’ विषयावर जिल्हास्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 3:17 PM