वाशिम जिल्हा टेन्ट ॲण्ड डेकाेरेटर असाेसिएशन व विवाह सेवा संघर्ष समितीने २५ मार्च राेजी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, लग्न समारंभास ५० टक्के क्षमतेनुसार परवानगी देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे, परंतु याची काेणीही दखल घेताना दिसून येत नाही.
यामुळे विवाहावर आधारित सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले ते कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारतर्फे या व्यावसायिकांना काेणतीही मदत जाहीर झाली नाही. त्यामुळे सर्वच जण अडचणीत आले आहेत. किमान लग्न समारंभांकरिता जागेच्या आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनुसार परवानगी द्यावी अशी मागणी केली. तसेच असे न झाल्यास १ एप्रिलपासून आम्ही आत्मनिर्भर हाेऊन व्यवसाय सुरु करणार आहाेत. आमचे हाॅल, सभागृह, व्यवसाय सील केल्यास आम्ही स्वताहून सील ताेडून पुन्हा व्यवसाय करण्याचा इशारा दिला. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्र्यांसह लाेकप्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.