गत दीड ते दाेन महिन्यांपासून लागलेल्या कडक निर्बंधांमुळे लघु व्यावसायिकांसह व्यापारी वर्ग घरी बसून हाेता. यामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान सहन करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली हाेती. आता जिल्हा अनलाॅक झाल्याने व्यापारात नक्कीच वृद्धी हाेईल हे शहरातील दुकानांवरील गर्दीवरुन दिसून येत आहे. परंतु काेराेना संसर्ग अद्याप संपला नाही याचा विसर नागरिकांना पडल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत वावरताना नागरिक काेराेना नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत. अनेक जण मास्कचा वापर करीत नसून फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करताना दिसून येत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कमी झालेला काेराेना संसर्ग वाढू नये यासाठी उपाय याेजना करणे गरजेचे आहे. साेमवारी जिल्हा अनलाॅक झाल्याने सर्व व्यवसाय पूर्ववत झाले असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम शहराला अनेक खेडी जाेडली असल्याने ग्रामीण भागातील अनेक ग्रामस्थ शेतीसह विविध वस्तू खरेदीसाठी आलेले दिसून आलेत. पेरणीची लगबग असल्याने कृषी सेवा केंद्रावरही माेठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
.................
नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन करावे
काेराेना संसर्ग कमी झाल्याने जिल्हा अनलाॅक करण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय सुरळीत हाेत असतांना नागरिकांनी सुध्दा काेराेना नियमांचे पालन करावे. नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व गर्दी हाेणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. काेराेना संसर्ग वाढणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.