लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत चार, पाच दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येते. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पारा १४ अंशापर्यंत घसरल्यामुळे तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे.डिसेंबर महिन्यापासून थंडीचा जोर हळूहळू वाढत आहे. आठवड्यापूर्वी ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा जोर थोडा कमी झाला होता. चार, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्याने थंडीचा जोर अधिकच वाढला आहे. दरम्यान थंडीत वाढ झाल्याने पहाटेच्या वेळी काही प्रमाणात धुके पडत आहे. याचा भाजीपाला आणि बागायती पिकांना फटका बसण्याचा धोका आहे, असा दावा शेतकºयांनी केला. तर या कडाक्याचा थंडीमुळे पिकांवरील रोगराई कमी होईल, असाही दावा शेतकºयांनी केला. धुक्यामुळे पिकांवर दव पडत आहे. याचा काही पिकांना उपयोग होत असला तरी भाजीपाला आणि बागायती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळी तापमानाचा पारा खाली येत असल्याने पहाटेदरम्यान थंडीचे प्रमाण अधिक राहते. सायंकाळीदेखील सूर्यास्तानंतर हळूहळू थंडी वाढते. थंडीपासून संरक्षण म्हणून ऊबदार कपडे घेतले जातात. शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे दिसून येते.
वाशिम जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 4:53 PM