लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये प्रभारी अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मंगरुळपीर यांच्यावतीने अवैध हातभट्टी दारु धंद्यावर धाडसत्र सुरु केले आहे. ९ ते १२ एप्रिल दरम्यान जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये धाडी टाकून हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्यात. ९ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये मानोरा तालुक्यातील अभईखेडा, चिस्ताळासह कारंजा , मालेगाव तालुक्यासह ९ ठिकाणी धाडी टाकून कारवाई करण्यात आली. एकूण ९ ठिकाणी धाडी टाकून ८ वारस व १ बेवारस गुन्हे नोंदवून मुंबई दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई एफ नुसार ८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. यामध्ये विजय झिता राठोड, धनंजय राजाराम जाधव, किशोर पुंडलीक राऊत,रमेश प्रल्हाद राऊत, सुमन गजानन जाधव, महादेव देवराव भेलके, दत्ता सदाशिव भेलके, निखील सुभाष टेंभरे यांचा समावेश आहे. या सर्व आरोपिंना अटक करुन त्यांचेकडून एकूण ३८६१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला. त्यामध्ये ९५ लिटर गावठी दारु, १८0 मी.ली. क्षमतेच्या देशीदारु संत्राच्या ८३ बाटल्या जप्त करुन एकूण १३६0 लिटर मोहाचा सडवा घटनास्थळीच नाश करण्यात आला. वरील कारवाईमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे एन.के.सुर्वे , दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिमचे डी.ओ.कुटेमाडे, सहायक दुय्यम निरीक्षक वाशिमचे के.अे.वाकपांजर, रंजीत आडे व सर्व जवान स्टॉफ नितीन चिपडे, दगडु राठोड, ललीत खाडे, नवृत्ती तिडके, स्वप्नील, महिला पोलीस शिपाई वर्षा चव्हाण , ज्योती खंदारे , वाहनचालक सुभाष आडे, संजय मगरे यांचा सहभाग होता.
वाशिम जिल्ह्यात हातभट्टी दारु अड्डय़ांवर धाडसत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 1:39 AM
वाशिम : वाशिम जिल्ह्यामध्ये प्रभारी अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मंगरुळपीर यांच्यावतीने अवैध हातभट्टी दारु धंद्यावर धाडसत्र सुरु केले आहे. ९ ते १२ एप्रिल दरम्यान जिल्हय़ातील अनेक गावांमध्ये धाडी टाकून हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्यात.
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हय़ात सर्वत्र कारवाई