वाशिम: महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील एकूण १ हजार ९६२ महिलांनी मतदार नोंदणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागातून शुक्रवारी प्राप्त झाली आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष मोहिम राबवून दि. १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकास स्वयाची १८ वर्षे पूर्ण करणार्या महिलांची या मोहिमेतंर्गत मतदार नोंदणी करण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर मतदार केंद्रस्तरीय अधिकार्यांनी उपस्थित राहून महिलांकडून मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले. जिल्ह्यातील एकूण १,९६२ महिलांनी विशेष मतदार नोंदणी मोहीम नाव नोंदविले. याशिवाय महिलांनी मतदार यादीमधील नाव वगळण्यासाठी अर्ज क्र. ७, मतदार यादीतील नावामध्ये दुरुस्तीसाठी अर्ज क्र. ८ व मतदार यादीतील मतदान केंद्रामध्ये नाव स्थानांतरीत करण्यासाठी अर्ज क्र. ८ अ भरून दिला आहे.
जिल्ह्यात १,९६२ नवे महिला मतदार
By admin | Published: March 19, 2017 4:57 PM