लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पोषण महिना अभियानाचा आढावा विभागीय उपायुक्त बोराखडे यांनी सोमवार १६ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा परिषदेत घेतला.बालकांचे पहिले १०० दिवस अॅनेमिया, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता, पौष्टिक आहार आदी विषयी जनजागृती करण्यासाठी पोषण महिना उपक्रम ३० सप्टेंबरपर्यंत राबविला जाणार आहे. या अभियानांतर्गत १६ सप्टेंबर रोजी विभागीय उपायुक्त बोराखडे यांनी जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रांना भेटी दिल्या तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांनी पोषण विषयक जास्तीत जास्त जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. मुलांमध्ये पोषक आहार, स्वच्छता, हात धुण्याचे महत्त्व आदी संदर्भात माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी दिली. यावेळी सहायक प्रशासन अधिकारी रुपेश निमके यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
विभागीय उपायुक्तांनी घेतला पोषण महिना अभियानाचा आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 5:41 PM