लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) वाशिम जिल्ह्यातील १०७८ कर्मचाºयांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे सणउत्सवाच्या काळात त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी ओढवली असून, दिवाळीही अंधारात जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.एसटी महामंडळात विविध संवर्गात कार्यरत कर्मचाºयांचे वेतन एसटीच्या उत्पन्नावरच अवलंबून असते. प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीतून मिळणाºया उत्पन्नाच्या आधारेच एसटीच बहुतांश खर्च भागविला जातो. तथापि, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटीची चाकेच थांबली आहेत. शासनाने पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीला मूभा दिल्यानंतरही प्रवाशांचा अपेक्षीत असा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसते. त्यामुळेच एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यात एसटी महामंडळाचे चार आगार आहेत. त्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड या आगाराचा समावेश आहे. यातील वाशिम आगारात ३२८, मंगरुळपीर आगारात २४३, कारंजा आगारात २५५, तर रिसोड आगारात २५२ कर्मचारी मिळून १०७८ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील ९० टक्के कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वेतनावरच आहे. त्यात तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने या कर्मचाºयांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. शिवाय, दिवाळीसारखा महत्त्वाचा सणही अंधारातच जाण्याची दाट शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्यातील १०७८ एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2020 12:38 PM