शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

दिवाळीत व्यावसायिकांची ‘दिवाळी’

By admin | Published: November 13, 2015 2:02 AM

गतवर्षीच्या तुलनेत वाहनांची उलाढाल जास्त; सोने खरेदीकडे मात्र नागरिकांनी फिरविली पाठ.

शिखरचंद बागरेचा / वाशिम : हिंदू संस्कृतीमधील महत्त्वाचा सण दिवाळी. या दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा. दरवर्षी दिवाळीत कोट्यवधींची खरेदी अपेक्षित असताना पीक परिस्थितीचा फटका दरवर्षी या सणाला बसला. २0१३ च्या तुलनेत २0१४ मधील दिवाळीत खरेदीवर परिणाम झाला. याही वर्षी याचा परिणाम इतर खरेदीवर दिसून आला असला तरी वाहन खरेदी मोठय़ा प्रमाणात झाल्याचे शहरातील व्यावसायिकांच्या आकडेवारीवरून दिसून आले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाल्याचे व्यावसायिकांनी केलेल्या व्यवसायाच्या आकडेवारीवरून दिसून येते. दिवाळीत चांगला व्यवसाय होईल म्हणून विविध व्यावसायिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये भरगच्च माल भरला; परंतु वाहनांव्यतिरिक्त अपेक्षित व्यवसाय न झाल्याने या दिवाळीत व्यावसायिकांचे दिवाळे निघाल्याचे दिसून येत आहे. जिल्हय़ातील पीक परिस्थितीचा फटका वाहन खरेदीव्यतिरिक्त सर्वच क्षेत्रातील उलाढालीवर दिसून आला. दसरा दिवाळीसारख्या महत्त्वपूर्ण असलेल्या सणासुदीच्या दिवसात उद्योग क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाल्यामुळे झालेल्या दिवाळीत वाहन विक्री व्यावसायिकांची दिवाळी झाल्याचे चित्र दिसून आले. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे आभूषण, दागिने तसेच मोटार, कार, ट्रॅक्टर्स, दुचाकी, तीनचाकी वाहन व फ्रीज, मोबाइल, एलईडी, वॉशिंग मशीन सोफासेट, आदी चैनीच्या वस्तूंचा माल व्यावसायिकांनी भरून ठेवला होता; मात्र सोयाबीन व अन्य रोख उत्पन्न देणार्‍या पिकांचे उत्पन्न अत्यल्प झाल्याने बळीराजा खरेदीसाठी बाजारात फिरकलाच नसला तरी नोकरदारांमुळे व्यवसाय झाल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. दीपावलीत धनत्रयोदशीच्या दिवशी व दिवाळीच्या दिवशी सोने खरेदी मोठय़ा प्रमाणात केल्या जाते. बहुतांश नागरिक धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानत असल्याने अनेक जण सोन्याची थोडी फार का होईना खरेदी करताना दिसून येते; मात्र धनत्रयोदशी व दीपावलीच्या दिवशी केवळ १ कोटी रुपयांच्या जवळपास विक्री झाल्याचे दिसून आले. ही विक्री गतवर्षीच्या निम्मीच असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.