कारखेडा : श्रीराम मंदिर संकल्प अभियानानिमित्त कारखेडा येथे श्री शंकरगिरी महाराज यांच्या मंदिरात दिनांक २ फेब्रुवारीपासून ज्ञानेश्वरी पारायण सुरु झाले आहे. राम मंदिर उभारण्यासाठी निधीचे संकलन सुरु असून, या अनुषंगाने ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पारायणाला ८५ जण उपस्थित होते. ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ह. भ. प. कृष्णराव महाराज, दिलीप महाराज, योगेश रोडेकर महाराज, ओम मात्रे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. ९ फेब्रुवारी राेजी नगर भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ७ फेब्रुवारी रोजी संस्थानचे अध्यक्ष योगेंद्र देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकर भोयर, सतीश देशमुख, ओमप्रकाश साबू, रमेश टेकाळे, मोहन देशमुख, रमेश टेकाळे, माणिक शिकारे, देविदास राठोड यांनी नियोजन बैठक आयोजित केली होती. महाप्रसाद कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात काेराेना नियमांचे पालन केले जात असून, भाविकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन शंकरगिरी महाराज संस्थानकडून करण्यात आले आहे.