कारंजा लाड : तालुक्यातील ग्राम दुघोरा येथील जिल्हा परिषद शाळैच्या पुरातन व धोकादायक असलेल्या ४ वर्गखोल्या पाडुन नव्याने बांधकाम करण्यात यावे अशी मागणी उध्दव पायरु गवई व इतर ग्रामस्थांनी केली आहे.निवेदनानुसार दुघोरा येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ८ आहे. शाळेच्या ४ वर्गखोल्यांचे बांधकाम सन १९५० च्या कालावधीतील असल्यामुळे त्या खोल्या अत्यंत जिर्ण व धोकादायक झाल्या असुन पडण्याचे मार्गावर आहे. शाळेतील ३ वर्गखोल्या चांगल्या व सुस्थितीत आहे.त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात शाळेचे सर्व वर्ग कोणत्या वर्ग खोल्यांमध्ये भरविण्यात येणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर पुरातन व धोकादायक वर्गखोल्यांचे बांधकाम पाडून त्या नव्याने बांधण्यात याव्या याकरिता शालेय व्यवस्थापन समितीच्यावतीने कारंजा पं.स. गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे करण्यात आले आहे. पंरतु त्याबाबत अद्यापही कोणत्याच प्रकारची कार्यवाही झाली नाही
धोकायदायक वर्गखोल्यांचे नव्याने बांधकाम करावे
By admin | Published: May 06, 2017 1:34 PM