लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिम तालुक्यातील पैनगंगा बॅरेजमधील पाणी अन्य ठिकाणी न देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांसह जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. वाशिम तालुक्याची वार्षीक पर्जन्यमान सरासरी ९००- १००० मी.मी. आहे . परंतु यावर्षी हे पर्जन्यमान ५० टक्के सुध्दा नाही. त्यामुळे संपूर्ण वाशिम तालुक्यात भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वाशिम शहराकरिता पैनगंगा बॅरेजमधील पाणी साठा उपसा केला तर पैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिक, जनावरे व प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे सदर बॅरेजमधील पाणी साठा उपसण्यात येवु नये, उपसा करावयाचा झाल्यास पैनंगगा नदीला पुर असतांनाच उपसा करावा. एकबुर्जी प्रकल्पातील ११ टि.एम.सी. पाणी साठा वाढवून त्याचे दुप्पट २२ टि.एम.सी. कायमस्वरुपी करता येईल अशी २०० कोटी रुपयांची योजना लघु सिंचन विभागाने शासनाकडे सादर केलेली आहे. सदर योजना मंजूर झाल्यास केकतउमरा, तोंडगाव, कोकलगाव, देवठाणा, विळेगाव, गणेशपुर, राजगाव, सुकळी, उकळीपेन या गावावर जो सिंचनाबाबतीत अन्याय झाला तो सुध्दा दूर होईल. वाशिम शहराचे पिण्याच्या पाण्याकरिता उपरोक्त गावांमधील सर्व सिंचन क्षेत्र १०० टक्के रद्द करण्यात आलेले आहे. याकडे लक्ष देऊन पैनगंगा बॅरेजमधील पाणी अन्य ठिकाणी देऊ नये, अशी मागणी शेतकºयांनी जिल्हा परिषद सदस्य चक्रधर गोटे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाºयांकडे केली.
‘बॅरेजमधील पाणी अन्यत्र देऊ नका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 7:19 PM
वाशिम तालुक्यातील पैनगंगा बॅरेजमधील पाणी अन्य ठिकाणी न देण्याच्या मागणीसाठी शेतक-यांसह जिल्हा परिषद सदस्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
ठळक मुद्देशेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर