0000000000000
मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ
वाशिम : सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. यामुळे गर्दी होत असून मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून येत आहे.
000000000000000
‘काॅन्टॅक्ट ट्रेसींग’ प्रक्रियेत अडचण
अनसिंग : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत; परंतु आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात अडचण येत आहे.
0000000000000000
कोरोनामुळे प्रशिक्षण कार्य थांबले
वाशिम : मध्यंतरी कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटातून बहुतांशी दिलासा मिळाल्याने बचतगटातील महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे सुरू करण्यात आले होते; मात्र आता पुन्हा हे संकट तीव्र झाल्याने प्रशिक्षण कार्य थांबले आहे.
000000000000000000
आठवडाभरात पाच हजार चाचण्या
वाशिम: जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर भर दिला असून, आठवडाभरात पाच हजारांपेक्षा अधिक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
00000000000000000
शेलू फाट्यावर वाहनांची तपासणी
वाशिम : शहरातून पुसदकडे जाणाऱ्या व शहरात येणाऱ्या सर्व वाहनांची शेलू फाट्यावर तपासणी केली जात आहे. शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात असून विना मास्क प्रवास करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
000000000000000
ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट
कोठारी : जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजेनंतर दुकाने उघडी ठेवण्यास बंदी घातली आहे. ९ मे पासून कडक निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातही दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
00000000000000000
ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ
वाशिम : कोरोनामुळे शाळा अद्याप बंद असून सकाळी ११ वाजेनंतर दवाखााने, मेडिकल वगळता इतर दुकानेही बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. यामुळे मात्र प्रवासीच मिळत नसल्याने ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
00000000000000
पाणीप्रश्न निकाली काढण्याची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. पाण्याचे फिल्टरही बंद आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत असून हा प्रश्न निकाली काढण्याची मागणी होत आहे.
000000000000000
रस्त्यावर उभारले प्रवासी निवारे
शेलुबाजार : वाशिम ते शेलुबाजार हा नव्याने रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात थांबता यावे, यासाठी नव्याने प्रवासी निवारे उभे करण्यात आल्याने प्रवाशांना सोयीचे झाले आहे.
0000000000000
घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत
कारंजा : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट तीव्र होण्यासोबतच रेतीही मिळत नसल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. यामुळे संबंधित लाभार्थी हतबल झाले आहेत.
000000000000000
‘त्या’ पुलाच्या दुरूस्तीची मागणी
वाशिम : कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी रामटेक या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून पुलाची दुरूस्तीही रखडली आहे. पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
................
बॅंकांमध्ये गर्दी; नियमांचे उल्लंघन
वाशिम : शहरातील विविध बॅंकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून फिजीकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.