रासायनिक शेतीमुळे शेतीचे उत्पन्न वाढत नाही, सेंद्रिय शेतीमुळे जमीन कस धरुन राहते. रासायनिक खतामुळे शेतीचा पोत खराब होतो. त्यामुळे कास्तकारांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती करा. त्यामुळे आपले पैसे वाचतात. शेतीचा पोत चांगला जोमदार होण्यासाठी आवश्यक आहे. पेरणीच्या वेळेस पेरणी करतेवेळी पेरणी सोबत रासानिक खताऐवजी गांडूळ खत एकरी कमीतकमी ७५ किलो द्या. त्यामुळे शेतातल्या जिवाणूला भरपूर प्रमाणात द्रव्ये मिळून जास्त प्रमाणात उत्पन मिळते. कपाशीसाठी १५ ते १८ दिवसात पुन्हा खत देणे गरजेचे आहे. तिथून चौथ्या दिवशी फवारणी करणे आवश्यक आहे. फवारणी करतेवेळी शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करा, कारण की फवारणीमुळे भरपूर प्रमाणात पिकाची वाढ होते. फवारणी करतेवेळी लिंबोळी अर्काची फवारणी करा. आपल्या भागामध्ये लिंबाची झाडे भरपूर प्रमाणात आहेत , त्यामुळे कास्तकारांनी येत्या दोन महिन्यात झाडाला भरपूर प्रमाणात लिंबोळी येतात त्या लिंबोळ्या जमा करून ५० टक्के लिंबोळी म्हणजे ६ किलो लिंबोळी व हिंग १०० ग्रॅम बारीक करून ९ लिटर गोमूत्रामध्ये टाकून आठ दिवस प्लास्टिक किंवा मातीच्या भांड्यात ठेवणे, नंतर सूती कपड्याने गाळून १५ लिटर पाण्यामध्ये ५०० मिली टाकणे त्यामधे ३० पंप होतात. ही फवारणी सोयाबीन पिकासाठी चांगली आहे ,अनेकांच्या शेतामध्ये तुरीला उधळी लागते ते कमी करण्यासाठी लिंबाचा पालापाचोळा जमा करुन पेरणीच्या १५ दिवस आधी पालापाचोळा ४० किलो शेतात टाकल्यामुळे उधळी कमी प्रमाणात लागते. नांगरणी शक्यतो लवकर करणे गरजेचे आहे त्यामुळे बुरशीचे प्रमाण कमी होते.अशी माहिती प्रगतशील शेतकरी मुंगसीराम उपाधे यांनी शेतकऱ्यांना दिली.
रासायनिक शेती करण्यापेक्षा सेंद्रिय शेती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:18 AM