निनाद देशमुख / रिसोड (जि. वाशिम): गोरगरीबांच्या वैद्यकीय सेवेसाठी शासनातर्फे तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या सोयीनुसारच्या हजेरीने रुग्णांना किती मानसिक त्रास सहन करावा लागतो, याची प्रचिती रिसोड ग्रामीण रुग्णालयात २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४५ ते १0.१५ या वाजतादरम्यान आली. केवळ एका चतुर्थ श्रेणी कर्मचार्याचा अपवाद वगळता सकाळी १0.१५ वाजेपर्यंंत या रुग्णालयात कुणीही उपस्थित नसल्याचे वास्तव लोकमतच्या कॅमेर्यात कैद झाले. डॉक्टरांकडे मरणाच्या दारातून परत आणणारे दूत, जीवदान देणारे देव म्हणून पाहिले जाते. डॉक्टरांच्या सेवेवर, उपचार पद्धतीवर संशय घेण्याचे कारणच नाही. गंभीर आजारातून बरे होण्यासाठी रुग्णांना देवापेक्षा डॉक्टरच वारंवार आठवतात. सरकारी दवाखान्यांमधील डॉक्टरमंडळीदेखील आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत सेवा देतात. तर काही मोजके डॉक्टर कर्तव्याशी बेईमानी करीत सोयीनुसार हजेरी लावतात. रिसोड ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ढेपाळला असल्याचे रुग्ण व नातेवाईकांकडून नेहमीच ऐकायला मिळते. २६ ऑगस्ट रोजी काही रुग्ण व नातेवाईक सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात आले असता, कुणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला मिळाल्यानं तर तातडीने घटनास्थळ गाठले. यावेळी अनेक गंभीर बाबी समोर आल्या. येथे तीन वैद्यकीय अधिकारी आहे त. मात्र, एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे अनेक रुग्ण व ना तेवाईकांना परत जावे लागले. औषधी भांडार कक्ष, निर्जंंतुकीकरण कक्ष, नेत्र विभाग कक्षाला कुलूप आढळून आले. ही परिस्थिती सकाळी १0.१५ वाजेपर्यंंंत कायम होती. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाचे एक पद, वैद्यकीय अधिकार्यांचे एक पद, स्टाफ नर्स एक पद, एक्सरे टेक्निशियन एक, औषधी निर्माता एक, कनिष्ठ लिपिक दोन, सहायक अधीक्षक एक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पाच अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. एकिकडे रिक्त पदे आणि दुसरीकडे डॉक्टर व कर्मचार्यांची सोयीनुसारची हजेरी यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे ताळतंत्र बिघडले असल्याचे २६ ऑगस्टला सकाळच्या सुमारास दिसून आले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षकही १0.१५ वाजेपर्यंत रुग्णालयात नसल्याचे दिसून आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे शिस्तप्रिय व कर्तव्यात तत्पर म्हणून ओळखल्या जातात. असे असतानाही रिसोड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची उपस्थिती राहू नये, ही बाब गंभीर आहे. याप्रकरणी सीएस डॉ. मेंढे काय पाऊल उचलतात, याकडे रुग्ण व नातेवाईकांचे लक्ष लागून आहे.
डॉक्टर फे-यावर; रुग्ण वा-यावर !
By admin | Published: August 28, 2015 12:08 AM