जिल्ह्यात लसीकरणासाठी नागरिक पुढाकार घेत असले, तरी आता लसींचे डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रशासनाला हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. दररोज १० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आरोग्य विभागात आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन दिवसांतून एकवेळा १२०० ते १५०० डोस मिळत आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये, तर दोन महिन्यांपासून लसच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचा दुसरा डोस रखडला आहे. लसीचा साठा वाढवावा आणि वेळेत लसीकरण पूर्ण करून घ्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
हेच का मोफत लसीकरण?
कोट : लसीचा दुसरा डोस घेण्याची तारीख निघून जात आहे. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी केंद्रात येरझारा सुरू असून, लस घेण्याचे आवाहन केले जाते. प्रत्यक्षात लस उपलब्ध नसल्याने अडचण झाली आहे.
- गौरव गायकवाड
-------
कोट : लसीकरण करण्याची इच्छा आहे. त्यासाठी केंद्रावर जाऊन लस उपलब्ध झाली का? ते पाहावे लागते. मात्र, आठ दिवसांपासून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने इच्छा असूनही लसीकरण करता आले नाही.
- शबनम परसुवाले
-----------
शासकीय रुग्णालयात केवळ १००० डोस
खासगी केंद्रातील लसीकरण बंद
--------
१) जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ एक ते दीड हजार डोसेस उपलब्ध असून, दररोज ग्रामीण भागात मोजक्याच केंद्रांवर लसीकरण होत आहे.
खासगी रुग्णालयांना लस विकत घेण्याचे बंधन शासनाने घातले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एकाही खासगी रुग्णालयात लस उपलब्ध नाही.
---------
जिल्हा शल्यचिकित्सकांचा कोट
कोट : राज्यस्तरावरून ज्या प्रमाणात लसीचा पुरवठा होतो, त्यानुसार लसीकरण केले जात आहे. मागील आठ दिवसांपासून तुटवडा जाणवत आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यासाठी लस उपलब्ध होणार आहे. त्यानंतर लसीकरण केंद्रे सुरू केली जातील.
- डॉ. मधुकर सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक,
---
१८ ते ४५ वयोगट -
पहिला डोस- १,२३,३२०
- दुसरा डोस - ७८,०००
एकही डोस न घेतलेले -३,५३,०००
----------
---
४६ ते ५९ वयोगट -
पहिला डोस -१,०७,२१०
- दुसरा डोस - ६१,०००
एकही डोस न घेतलेले १,०२,०००
-----------
---
६० पेक्षा जास्त-
पहिला डोस -९०,५२७
- दुसरा डोस - ४०,०६४
एकही डोस न घेतलेले -५४,३५९