वाशिममार्गे पूर्णा-अकोला, आदिलाबाद-परळी, नांदेड-नागरसोल या पॅसेंजर रेल्वे धावत होत्या. कोरोना काळात मात्र खबरदारीची उपाययोजना म्हणून एक्स्प्रेस रेल्वेसह पॅसेंजर रेल्वेचाही प्रवास थांबविण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून संसर्गाचे संकट ओसरू लागल्यामुळे एक्स्प्रेस सुरू झाल्या ; परंतु पॅसेंजर आजही बंदच असून सर्वसामान्य प्रवाशांची यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
..................
१) सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस (पॉईंटर्स)
नरखेड-काचीगुडा
अमरावती-तिरूपती
हैदराबाद-जयपूर
सिकंदराबाद-जयपूर
गंगानगर-नांदेड
२) सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन (पॉईंटर्स)
अमरावती-तिरूपती
तिरूपती-अमरावती
................................
मग पॅसेंजर बंद का?
पूर्णा-अकोला, आदिलाबाद-परळी, नांदेड-नागरसोल
................
एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही
पॅसेंजरच्या तुलनेत एक्स्प्रेस रेल्वेचे तिकीट दर अधिक आहेत. याशिवाय सध्या आरक्षणाशिवाय या रेल्वेने प्रवास देखील करता येत नाही. एसटीचे तिकीट दरही वाढलेले आहेत. यामुळेच एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नसून पॅसेंजर सुरू व्हायला हवी.
- शुभम कुचेकर
........................
एसटी आणि एक्स्प्रेस रेल्वेचा प्रवास पूर्वीप्रमाणेच सुरू झालेला आहे. पॅसेंजर रेल्वे मात्र अद्यापपर्यंत सुरू करण्यात आली नाही. सर्वसामान्यांना पॅसेंजरचा प्रवास परवडतो. त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने रेल्वे तत्काळ सुरू करावी.
- अविनाश मुळे
.......................
वाशिममार्गे एक्स्प्रेस रेल्वेचा प्रवास सुरू झालेला आहे. पॅसेंजर रेल्वेही सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून येत्या काही दिवसात पूर्वीप्रमाणेच वाशिममार्गे पॅसेंजर सुरू होतील. प्रवाशांनी धीर धरायला हवा.
- एम.टी. उजवे
स्टेशन मास्तर, रेल्वेस्थानक, वाशिम