वाशिम: मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालून १२ लोकांवर हल्ला करीत त्यांना चावा घेतले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असून, त्यामध्ये दोन बालक आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. ही घटना ३ जून रोजी घडली. पिसाळलेल्या कुत्र्याने इतर कुत्र्यांनाही चावा घेतले आहेत. मंगरुळपीर शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त वाढला आहे. यातील पिसाळलेल्या एका कुत्र्याने रविवार ३ जून रोजी शिवाजीनगरसह परिसरात धुमाकूळ घालत लोकांवर हल्ले करीत १२ लोकांना चावे घेतले. त्यापैकी अदविया खानम आसिफ खान (०४), संस्कृती राजु मते (०५), कुसुमबाई वसंतराव मिसाळ (७८) सर्व रा. मंगरुळपीर आणि राहुल सुभाष राऊत (१८) रा. वरुड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंगरुळपीर रुग्णालयात प्राथमिक ऊपचार करुन पुढील ऊपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. या कुत्र्याने इतर एका कुत्र्याला चावा घेतला. त्यावेळी वन्यजीव रक्षकांनी ज्या कुत्र्याला चावा घेतला. त्याला अॅन्टी रॅबिज इंजेक्शन दिले.
मंगरुळपीर येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; १२ जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 3:20 PM
वाशिम: मंगरुळपीर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालून १२ लोकांवर हल्ला करीत त्यांना चावा घेतले. यातील चौघांची प्रकृती गंभीर असून, त्यामध्ये दोन बालक आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे.
ठळक मुद्देपिसाळलेल्या एका कुत्र्याने रविवार ३ जून रोजी शिवाजीनगरसह परिसरात धुमाकूळ घालत लोकांवर हल्ले करीत १२ लोकांना चावे घेतले. मंगरुळपीर रुग्णालयात प्राथमिक ऊपचार करुन पुढील ऊपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.