लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार घरगुती गॅस-सिलींडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता येत नाही. मात्र, हा नियम डावलून जिल्ह्यातील चहा, नाश्ताची हॉटेल्स चालविणाºया अनेकांकडून घरगुती गॅस-सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याने हा प्रकार चांगलाच फोफावल्याचे दिसून येत आहे.घरगुती वापराचे गॅस-सिलिंडर आणि व्यावसायिक वापराचे गॅस-सिलिंडरच्या आकारात, गॅसच्या वजनात आणि आकारल्या जाणाºया रक्कमेत बरीच तफावत आहे. व्यावसायिक वापराचे गॅस-सिलिंडर तुलनेने महाग पडत असल्याने हॉटेल्स व्यावसायिक कुठलाही विचार न करता घरगुती गॅस-सिलिंडरवरच आपली गरज भागवत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे ज्या कुटूंबांकडे गॅस आहे; पण ते त्याचा वापर करित नाहीत, अशा लोकांकडून नियमबाह्य पद्धतीने सिलिंडर घेतले जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून सुरू असलेला या प्रकारावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
घरगुती गॅस-सिलींडरचा हॉटेल्समध्ये होतोय वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 6:21 PM