लोकमत न्यूज नेटवर्कतळप बु. : वाशिम जिल्ह्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून चोºयांचे सत्र वाढले असून चोरट्यांनी मंदिरांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे. तळप बु. येथील नागाबुवा मंदिरात २२ जुलैच्या रात्री झालेल्या चोरीत दानपेटीसह मंदिरावरील कळस आणि घंटा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.तळपवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या नागाबुवा महाराज यांचे गावाबाहेर मंदिर वसलेले आहे. या मंदिरामध्ये २२ जुलैच्या रात्री चोरट्यांनी प्रवेश करून दान पेटीतील रक्कम लंपास केली. एवढ्यावरच चोरटे थांबले नाही तर मंदिरावरील कळस आणि घंटाही लंपास केला. यावरून नागरिकांची घरे असुरक्षित असण्यासोबतच आता मंदिरेही चोरट्यांच्या ‘रडार’वर असल्याचे दिसून येत आहे. पोलिस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
मंदिरातील दानपेटीसह कळस आणि घंटा चोरीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 4:50 PM