मालेगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे आता हलगर्जीपणा नको; तर नागरिकांनी सावध होणे अत्यावश्यक असून, कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीने सर्वच क्षेत्र प्रभावित झाली. अनलॉकनंतर कोरोनाच्या सावटात लसीकरणाला सुरुवात झाल्याने आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. परंतु, लसीकरण म्हणजे कोरोना संपला नव्हे; त्यामुळे नागरिकांनी यापुढेही दक्ष राहणे आवश्यक आहे. गत काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. बाजारपेठ किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात वारंवार धुवावे, असे आवाहन तालुका प्रशासन, नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने गुरूवारी केले. मास्कचा वापर न करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आहे. ही कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.