लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत सहा महिन्यांपासून बंद असलेली वाचनालय १५ आॅक्टोबरपासून सुरू झाले. परंतू, कोरोनाची धास्ती कायम असल्याने किरकोळ अपवाद वगळता वाचनालयांमध्ये वाचक येत नसल्याचे दिसून येते.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन असून, या लॉकडाऊनचा फटका इतर क्षेत्राप्रमाणेच सार्वजनिक ग्रंथालयांनादेखील बसला. जिल्ह्यात एकूण ३१२ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. वाशिम तालुक्यात अ वर्ग दर्जाचे एक, ब वर्ग दर्जाचे पाच, क वर्ग दर्जाचे १७ आणि ड वर्ग दर्जाचे २५ असे एकूण ४८ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. कारंजा तालुक्यात ३९, मालेगाव तालुक्यात ५७, मंगरूळपीर तालुक्यात ७३, रिसोड तालुक्यात ५५, मानोरा तालुक्यात ४० वाचनालये आहेत. २४ मार्च ते १४ आॅक्टोबर या दरम्यान जिल्ह्यातील वाचनालये बंद होती. यामुळे वाचन संस्कृती चळवळही बºयाच अंशी प्रभावित झाली. दरम्यान, १५ आॅक्टाबेरपासून काही नियम, अटी लादून वाचनालये सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवी झेंडी दिली. वाचनालयांचे निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझर, तापमान मोजण्याची मशिन, फिजिकल डिस्टन्सिंगची व्यवस्था वाचनालयांतर्फे करण्यात आली. दुसरीकडे कोरोनाचे संकट अजून कायम असल्याने वाचक पूर्वीप्रमाणे वाचनालयात येत नसल्याचे दिसून येते. शनिवार, रविवारी वाशिम शहर व ग्रामीण भागातील काही वाचनालयांची पाहणी केली असता, वाचनालयात दोन, तीन वाचक येत असल्याचे दिसून येते. वाशिम येथील राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय सर्वश्रूत असून, येथे शनिवारी १० तर रविवारी केवळ दोन वाचक आले होते. शासनाच्या निर्देशानुसार ग्रंथालयात सॅनिटायझर, आॅक्सिमिटरसह फिजिकल डिस्टन्सिंगची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी १० आणि रविवारी दोन वाचक आले होते.- संतोष काळमुंदळेग्रंथपाल, राजे वाकाटक वाचनालय वाशिम
वाचनालयांचे दरवाजे उघडले; पण वाचक फिरकेनात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:42 PM