-------------
वाशिम-केकत उमरा रस्त्याची दुरवस्था
केकत उमरा : वाशिम येथून केकत उमरा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडलेले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत असल्याने गटारे तयार झाली आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालविण्यात अनेक अडचणी येत आहेत.
----------
निकृष्ट बियाण्यांच्या भरपाईची प्रतीक्षा
काजळेश्वर उपाध्ये : काजळेश्वरसह परिसरातील उकर्डा, पानगव्हाण, जानोरी, पलाना शेतशिवारातील शेतकऱ्यांवर यंदा निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. हंगाम संपला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून मदत मिळाली नाही. याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी काजळेश्वर येथील शेतकरी महेंद्र उपाध्ये यांनी शुक्रवारी केली.
-------------
रस्त्यावरील पाण्यामुळे ग्रामस्थांना अडचणी
उंबर्डा बाजार : परिसरातील गावांतील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यामुळे वाहनधारकांना ये-जा करण्यात अडचणी येत आहेतच. शिवाय गटाराच्या दुर्गंधीसह जंतुसंसर्गाच्या भीतीमुळे आरोग्यही धोक्यात असून, संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने ही समस्या लक्षात घेता या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी गुरुवारी ग्रामस्थांनी केली.
----------------
भाजीपाला उत्पादनाबाबत मार्गदर्शन
बांबर्डा कानकिरड : कारंजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथे शेतकऱ्यांना सेंद्रीय भाजीपाला उत्पादन व विक्रीबाबत कृषी विभागाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी गटातील शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादन व विक्री या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चर्चासत्र घेण्यात आले.
-----------------
===Photopath===
100121\10wsm_6_10012021_35.jpg
===Caption===
शेंगाविनाच सुकले तुरीचे पीक