शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
5
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
6
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
7
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
8
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
9
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
10
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
11
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
12
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
13
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
14
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
15
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
16
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
17
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
18
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
19
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
20
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

चालकाला गुंगारा देवून पळविली कार

By admin | Published: March 22, 2017 5:14 PM

खासगी कार भाड्याने घेऊन जात असताना चालकाला पाणी आणण्यासाठी उतरवून कार पळवून नेल्याची घटना शहरातील अकोला नाका परीसरात मंगळवारी घडली.

वाशिम : औरंगाबाद येथे कामानिमित्त जाण्यासाठी खासगी कार भाड्याने घेऊन जात असताना चालकाला पाणी आणण्यासाठी उतरवून कार पळवून नेल्याची घटना शहरातील अकोला नाका परीसरात मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. परभणी जिल्ह्यातील रहिवाशी असलेला कार चालक अमजद खॉ कदीर खॉ याने पोलिसांनी तक्रार दिली की, जिंतूर येथील शे.खलील शे. फकरु यांच्या मालकीच्या एम.एच.२२ यू -७४०१ या क्रमांकाच्या कारवर चालक म्हणून काम करतो. दरम्यान, जिंतूर येथील खासगी वाहन तळावर एका युवकाने महत्वाच्या कामासाठी औरंगाबाद येथे जायचे असल्याचे सांगून गाडी भाड्याने ठरविली. सकाळी ७ वाजता जिंतूर येथून निघून सकाळी १० वाजता वाशिममधील अकोला नाका परिसरात पोहचलो. त्यावेळी गाडीतील इसमाने नातेवाईक महिला येत असल्याचे सांगून गाडी थांबविण्याचे सांगत पिण्यासाठी पाणी बॉटल घेण्याचे सांगितले. त्यामुळे जवळच असलेल्या दुकानवर पाणी आणण्यासाठी गेलो असता सदर युवकाने इरटीका कंपनीची ११ लाख रुपये किंमतीची कार घेवून तेथून पोबारा केला. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करुन प्रकरण तपासात घेतले आहे.