लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील आमदारांची चमू १५ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाली असून, मुंगळा, काटा यासह मानोरा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी या समितीपुढे आपल्या व्यथा मांडल्या असून, दुष्काळी भागात तातडीने उपाययोजना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडे मागणी केली जाणार आहे. सध्या राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र विभागामधील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाराटंचाई तसेच रोजगाराचा प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करीत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या आमदारांची समिती विदर्भातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करीत आहे. १५ मे रोजी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मालेगाव तालुक्यातील मुंगळा, वाशिम तालुक्यातील काटा, मानोरा तालुक्यातील वापटी येथील दुष्काळी भागाची पाहणी केली. आॅरेंज व्हिलेज अशी ओळख असलेल्या मुुंगळा येथील शेतकºयांना सद्यस्थितीत भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्याच्या व्यथा शेतकºयांनी मांडल्या. पाण्याअभावी संत्रा बागा सुकून जात आहेत. एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व वादळवाºयामुळे संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही भरपाई मिळालेली नाही अशी आपबिती शेतकºयांनी मांडली. काटा परिसरातही दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याशी दुष्काळी परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याची मागणी केली. रोजगाराअभावी जिल्ह्यातील मजुरांचे अन्यत्र स्थलांतर होणार नाही, याची काळजी घ्यावी, जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करावा अशा सूचनाही आमदारांनी केल्या. दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याकरीता शासनाला भाग पाडण्यासाठी हा दुष्काळी दौरा असल्याचे या समितीने सांगितले. या समितीचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार विरेंद्र जगताप, आमदार रणजित कांबळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, नतिकोद्दीन खतीब, समिती समन्वयक अतुल लोंढे आदींनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीप सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाºयांची बहुसंख्येचे उपस्थिती होती.
काँग्रेसच्या आमदारांकडून दुष्काळी भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 2:32 PM