रिसोड (वाशिम) : पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. ४ ते ५ दिवसाच्या कालावधीमध्ये पाऊस न झाल्यास शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहे. तालुक्यामध्ये ७६ हजार २00 हेक्टरवर जून महिन्यामधील पेरणीचा टप्पा पूर्ण झाला आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये पिकाची अवस्था फार बिकट बनली आहे. डोंगराळ भागावरील पिके करपू लागली आहे. तालुक्यामध्ये साधारणात: सोयाबीनचा पेरा जास्त आहे. तसेच मूग, तूर, हळद आदी पिकांचा समावेश आहे.
रिसोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
By admin | Published: July 07, 2015 1:11 AM