लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसापासून औषधींचा तुटवडा भासत असून, काही औषधी रुग्णांना खाजगी दुकानातून विकत घ्यावी लागत आहे. रुग्णांच्या वाढत्या औषधींचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यातच नव्या ईमारतीचे लोकार्पण रखडले असून, अपुऱ्या असलेल्या जुन्या ईमारतीतच या केंद्राचा कारभार चालविला जात आहे.शिरपूर जैन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसापासून ताप, खोकला, अंगदुखी सह विविध आजाराचे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रति दिवशी किमान २०० रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टरांची संख्या ब?्यापैकी असल्याने तपासणी योग्य प्रकारे. होत आहे. मात्र या रुग्णांसाठी लागणारे औषधीचा पुरवठा वरिष्ठ स्तरावरून सध्याच्या रुग्णसंख्या नुसार होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंदात औषधींचा तुटवडा भासत आहे. त्यातच जी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खोकल्याचे औषध शिल्लकच नव्हते. तरी इतर आजारावरील औषधीचा सुद्धा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी वरिष्ठ स्तरावरून रुग्ण संख्या लक्षात घेता योग्य प्रमाणात औषधी पुरवठा करण्यात यावा. अशी मागणी रुग्णाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. मात्र या नवीन इमारतीचे अद्यापही लोकार्पण करण्यात आले नाही.परिणामता अतिशय अपुरा जागेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची परवड होत असल्याचे शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील जुन्या इमारतीमध्ये दिसून येत आहे.
शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही दिवसापासून ताप, खोकला आजाराचे रुग्ण तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. रुग्ण संख्या प्रचंड वाढल्याने औषधीची कमतरता भासत आहे. वरिष्ठ स्तरावर औषधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच औषधी उपलब्ध होईल.-डॉ श्रीकांत करवतेवैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर