लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली. प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पीक पैसेवारी हा शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यात कसूर न होता दुष्काळसदृश स्थितीत शासनाकडून मिळणारे सर्व फायदे पदरात पडावे, अशी शे तकर्यांची अपेक्षा असते. दरम्यान, यंदा परिस्थिती अत्यंत बिकट असून, पावसाळ्याचे दिवस संपत आले असतानाही जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. यामुळे लघू आणि मध्यम अशा सर्वच १२५ सिंचन प्रकल्पांमध्ये थोडाथोडकाच पाणीसाठा शिल्लक असून, पाण्याअभावी सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात मोठी घट झाली आहे. तूर, मूग, उडीद या पिकांपासूनही विशेष उत्पन्न हाती पडणार नसल्याचे संकेत आहेत. पाण्याअभावी आगामी रब्बी हंगामावरही संकट घोंगावत आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे कुठल्या आधारावर काढली, असा सवाल शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे.
कोरड्या दुष्काळाचे सावट; मात्र नजरअंदाज पैसेवारी ५८ पैसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:25 AM
वाशिम : शेतमालाचे घसरलेले दर, घटलेले पर्जन्यमान आणि त्यामुळे खरीप हंगामात उद्भवलेले नापिकीचे संकट तद्वतच अडचणीत सापडलेला रब्बी हंगाम, जिल्ह्यावर घोंगावत असलेले दुष्काळाचे सावट, या सर्व बाबी दुर्लक्षित ठरवत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच गावांची नजरअंदाज पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक अर्थात सरासरी ५८ पैसे जाहीर केली. प्रशासनाच्या या अजब धोरणामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे अजब धोरण शेतकर्यांमध्ये नाराजी