मानोरा : गेल्या १० दिवसापासून मानोरा परिसरात पावसाने दडी मारली होती. रविवारी २५ सायंकाळी परिसरात पाऊस बरसला. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यास सुरुवात झाली. बि - बियाणे, खते घेण्यासाठी आज शेतकऱ्यांनी कृषी केंद्रावर गर्दी केली होती.गुरुवारी १५ जुन रोजी परिसरात मुसळधार पाऊस बरसला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. ५० टक्के पेरण्या आटोपला आहेत. उर्वरीत पेरण्या पाऊस नसल्याने खोळंबला होत्या. मात्र रविवारी दि.२५ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास परिसरात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी २६ जुन रोजी पेरणीला सुरुवात केली. गेल्या आठवडाभर शहरातील कृषी केंद्र ओस पडले होते. मात्र आता पाऊस आल्याने सोमवारी २६ जुन रोजी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.
पावसाचे आगमन होताच कृषी केंद्रावर गर्दी
By admin | Published: June 27, 2017 1:49 PM