लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : गत २१ आॅक्टोबरपासून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावाने सोयाबीनची विक्री करण्याची वेळ आली आहे.सध्यपरिस्थितीत कारंजा तालुक्यात जवळपास ६० टक्के सोयाबीनची सोंगणी व मळणी झाली असून, उवरित ४० टक्के सोंगणी होणे बाकी आहे. सुरूवातीला निवडणूकीमुळे मजूर न मिळाल्यामुळे ही सोंगणी लांबली होती. त्यातच दिवाळी सण तोंडावर आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी मळणी केलेले सोयाबीन विकून यंदाची दिवाळी परिवारासह साजरी करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु कारंजा बाजार समितीत २१ आॅक्टोंबर ते २४ आॅक्टोंबर या काळात निवडणूक व मतमोजणीमुळे तर २५ आॅक्टोंबर ते ३० आॅक्टोंबर दिवाळीमुळे बंद असल्याने शेतकºयांचे सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न भंगले. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी शेतकºयांनी खासगी बाजारात सोयाबीन विक्रीकरिता आणले असता, त्याची मातीमोल भावाने खासगी व्यापाºयांकडून खरेदी केल्या जात आहे. दिवाळीदरम्यानही मातीमोल भावाने खरेदी केली होती. कष्टाने पिकविलेल्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. परंतू, दिवाळी सणानिमित्तची गरज भागविण्यासाठी शेतकºयांना सोयाबीन विक्रीशिवाय पर्याय नाही. नवीन सोयाबीन बाजारात दाखल होताच सोयाबीनचे दर ३ हजार ६०० रूपयांच्या घरात होते. परंतु बाजार समितीत जसजशी सोयाबीनची आवक वाढत गेली तसतसे सोयाबीनचे दर काही प्रमाणात खाली येऊन ३२०० ते ३४०० रूपयाच्या घरात येउुन पोहचले. त्यातही विधानसभा निवडणूक व दिवाळीमुळे कारंजा बाजार समिती १० दिवस सलग बंद असल्याने खासगी बाजारात सोयाबीनचे दर दोन ते अडीच हजारांवर येउुन ठेपले. यामुळे शेतकºयांना प्रतिक्ंिटल हजार ते दिड हजार रूपयांचा फटका बसत आहे.
कारंजा बाजार समिती बंदमुळे सोयाबीनची मातीमोल भावाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 2:49 PM