मोप या गावाला आसोला, वढव, कन्हेरी, कौलखेडा, बोरखेडी, चाकोलीसह आदी गावांतील नागरिकांची सतत ये-जा आसते. मेहकरला जाण्यासाठी जवळचा मार्ग असून मोप येथेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे येथे सतत नागरिकांची वर्दळ आसते. येथील बाजारपेठ बऱ्यापैकी मोठी असल्याने नजीकच्या गावातील शेतकरी विविध बाबींसाठी मोप येथे जातात. परंतु मागील दीड महिन्यापासून मोप बसथांब्यासह, शिवाजी विद्यालयासमोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांचा रोष संबंधित कंत्राटदार कंपनीवर ओढविल्या जात आहे. दीड महिन्यापासून एका बाजूचा रस्ता खोदून त्यावर खडी दाबल्या गेली होती. परंतु आज दाबलेली खडी पूर्ण पणे उखडली आहे. संबंधित रस्त्यावर पाण्याचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदार कंपनीने रस्ता कामाला तत्काळ सुरुवात करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
रस्ता काम बंद पडल्याने माेपवासीयांना साेसाव्या लागतात यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:44 AM