वाशिम : शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. सदर आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली. राज्यभरात सुरु असलेल्या या आंदोलनामध्ये ७५० कर्मचारी सहभागी आहेत.महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्याकरीता ४३०० कोटी रुपयांची विकास कामे मंजुर केलेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्र मध्ये नऊशे कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ३४०० कोटी रुपयांची विकास कामे प्रलंबित आहेत. सदर कंत्राटी कर्मचाºयांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यामध्ये पगारवाढ, प्रवास भत्ता, वैद्यकीय खर्च या बाबीवर साधारण ६ कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च येणार आहे. तो खर्च ४३०० कोटी रुपयांच्या तुलनेत ०.००१३ टक्के राहणार आहे. अद्यापपर्यंत कंत्राटी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची ४३०० कोटी रुपयांची विकास कामे ठप्प पडली आहेत. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे कंत्राटी कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळू शकला नाही , त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेत कर्मचाºयांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या देत आहेत. कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनाचा परिणामी कार्यालयीन कामकाजावर होत असल्याने सदर आंदोलन कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले आहे. जिल्हयात सुरु असलेल्या काम बंद आंदोलनामध्ये पुरुषोत्तम शामराव मुंधरे, अनिल मधुकर फुलके, प्रकाश सखाराम राठोड, अमोल अंबादास ठाकरे, जितेंद्र विठ्ठल कांबळे, सत्यम उत्तमराव मोकळे, निरज दशरथराव उकंडे, विजु चंपतराव नगराळे, ओंकार रामदास झुंगरे, संतोष विश्वनाथ सावरकर, गजानन किसनराव खाडे, संतोष जानकीराम चव्हाण, राजेश लालसिंग राठोड, सचिन रमेश देशमुख, चेतन उमेशराव वानखडे, प्रदिप नारायण कोगदे, निशिकांत नारायणराव टवलारे, नितिन सुधाकर फुरसुले, सागर शशिकांत कांबळे, सुनिल रामेश्वर पैठणे, श्रीकृष्ण हरीभाऊ गोरे, विनेश श्रीराम चव्हाण यांच्यासह अनेक कर्मचाºयांचा समावेश आहे.जोपर्यंत कंत्राटी कर्मचाºयांना न्याय मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. जिल्हास्तरावर सुरु असलेल्या आंदोलनाबाबत राज्यस्तरिय समितीसोबत दररोज विचार विनीमय केल्या जात आहे.- अनिल मधुकरराव फुलके, वाशिम जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटना
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील ४३०० कोटींची विकास कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 3:35 PM
वाशिम : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली.
ठळक मुद्दे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्याकरीता ४३०० कोटी रुपयांची विकास कामे मंजुर केलेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्र मध्ये नऊशे कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ३४०० कोटी रुपयांची विकास कामे प्रलंबित आहेत.