लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: तालुक्यातील मांडवा येथील शालू नारायण राठोड ही गर्भवती महिला आपल्या पतीसोबत विजयादशमीच्या दिवशी ३0 सप्टेंबरला रिसोडकडे येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला. योगायोगाने याचदरम्यान कुर्हा येथे रुग्णास सोडण्याकरिता आलेल्या शासकीय रुग्णवाहिकेमुळे सदर महिलेस वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे शक्य झाल्याने पुढील अनर्थ टळला. मांडवा येथील शालू राठोड ही महिला आपल्या पतीसोबत शनिवारी रिसोडकडे येत होती. मात्र, यादरम्यान रस्त्यातच तिला प्रसूती वेदना सुरू होऊन तिने मुलीला जन्म दिला. सदर घटनेची माहिती मिळताच भर येथील महादेव घुगे, सामाजिक कार्यकर्त्या लता कांबळे, संतोष तालखेडकर, प्रदीप गरकळ, डॉ.सुरेश गटकळ, सुदाम जुमडे यांनी पुढाकार घेत, खासगी ऑटोची व्यवस्था करून सदर महिलेस रिसोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, याचदरम्यान योगायोगाने रिसोड ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका कुर्हा येथे जात असताना ती थांबवून सदर महिलेस त्याव्दारे तडकाफडकी रिसोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
रस्त्यानेच झाली महिलेची प्रसूती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 2:24 AM
रिसोड: तालुक्यातील मांडवा येथील शालू नारायण राठोड ही गर्भवती महिला आपल्या पतीसोबत विजयादशमीच्या दिवशी ३0 सप्टेंबरला रिसोडकडे येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती होऊन तिने गोंडस मुलीला जन्म दिला. योगायोगाने याचदरम्यान कुर्हा येथे रुग्णास सोडण्याकरिता आलेल्या शासकीय रुग्णवाहिकेमुळे सदर महिलेस वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे शक्य झाल्याने पुढील अनर्थ टळला.
ठळक मुद्देआई व बाळ सुखरूप भरजहाँगीर येथील प्रकार