शरपूर: मालेगाव तालुक्यातील अढळ नदीला तीन दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे मिझार्पूर-शिरपूर रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, येत्या काही दिवसांत सततच्या पावसामुळे या गावच्या लोकांच्या समस्या आणखी वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील मिझार्पूरवासियांना येजा करण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या शिरपूर रस्त्याची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी उन्हाळ्यात करण्यात आली होती. अढळ नदीवर होत असलेल्या महत्त्वाकांक्षी मिझार्पूर प्रकल्पामुळे या रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्यासह रस्त्याची दूरूस्ती करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन मिझार्पूरच्या ग्रामस्थांनी हा रस्ता न झाल्यास मिझार्पूर लघू प्रकल्पाची घळ भरणी न करण्याची निवार्णीची मागणी प्रशासनाकडे केली होती; परंतु प्रशासनाने या रस्त्याची साधी डागडुजी सुध्दा केली नाही. या मिझार्पुर शिवारातुन अढळ नदीचे उगमस्थान आहे. ही नदी मिझार्पूर ते शिरपूरची या मार्गावरून वाहते. मात्र या ठिकाणी वारंवार मागणी करुनही उंच पूल आजवर बांधल्या गेला नाही. दोन दिवसांपूर्वी मुसळधार व अवकाळी पावसामुळे अढळ नदीला आलेल्या पुराने या रस्त्यावरून पाणी वाहिले. पावसामुळे बुधवारी दुपारपयर्ंत या रस्त्यावरुन अर्धा पुरुष उंचीपेक्षा जास्त पाणी वाहत राहिल्याने मिझार्पूर वासियांना शिरपूरच्या आठवडी बाजाराला जाता आले नाही, तसेच पहिल्याच पावसात या मुळातच दूरवस्था असलेल्या या मागार्चे तीनतेरा वाजले. पुलानजिकच्या दोन्ही बाजुची सडक वाहुन चालल्याने साधा ऑटोरिक्षाही या मार्गावरून जाणे कठीण झाले आहे.
पुरामुळे मिझार्पूर-शिरपूर रस्त्यावरील वाहतूक बंद
By admin | Published: June 18, 2017 7:26 PM