शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

वाशिमच्या भुगर्भातील रहस्यांचा उलगडा झालाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 4:10 PM

वाशिम : एकेकाळी राजे वाकाटक यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम शहरातील भुगर्भात अनेक रहस्य दडलेले आहेत.

- सुनील काकडे ।वाशिम : एकेकाळी राजे वाकाटक यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम शहरातील भुगर्भात अनेक रहस्य दडलेले आहेत. १९९४, ९५ आणि २००५ मध्ये तीनठिकाणी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या उत्खननामध्ये आढळलेली जुनी बांधकामे, अवशेष, रजत आणि ताम्र नाणी आदींवरून त्यास पुष्टी देखील मिळाली. मात्र, अर्धवट स्थितीत झालेल्या या उत्खननामुळे या रहस्यांचा पूर्ण उलगडा झाला नाही. तेव्हापासून २४ वर्षे उलटूनही पुरातत्व विभागाने या रहस्यांवरील पडदा हटविण्यासाठी कुठलेच ठोस प्रयत्न देखील केले नाहीत.विविध स्वरूपातील ऐतिहासिक, पौराणिक अख्यायिका लाभलेल्या वाशिम शहरातील दक्षिण दिशेला असलेल्या लालटेकडी परिसरात पुरातत्व विभागाकडून सन १९९४ आणि १९९५ अशा दोन टप्प्यात उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात तिसºया क्षत्रपांची ५१ नाणी, २५१ रजत मुद्रा आढळल्या होत्या. याशिवाय जुन्या पद्धतीच्या विटांचे आखीव-रेखीव निवासस्थान, भगवान महाविर तिर्थंकर यांच्या मुर्तीचे ३४ बाय २३ बाय १५ सेंटीमिटर आकाराचा शिर्षभाग, बेसाल्ट दगडापासून तयार करण्यात आलेली स्त्री मुर्ती देखील या उत्खननादरम्यान बाहेर काढण्यात आली. मात्र, पुरेशा निधीअभावी पुरातत्व विभागाला पुढचे उत्खनन करण्यात अडचणी निर्माण झाल्याने २४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेले हे काम पुन्हा हाती घेण्यात आले नाही.याचदरम्यानच्या काळात सन १९९५ मध्ये पुरातत्व विभागाने वाशिम शहरातील गवळीपूरा भागातील चामुंडादेवी मंदिर परिसरात उत्खननाचे काम हाती घेतले.त्यातही तळातील बांधकाम, मानवी सांगाडे, ताम्र नाणी आदी बाबी आढळून आल्या होत्या. हे उत्खननही पुरातत्व विभागाने अर्धवट अवस्थेतच सोडून दिले, जे आजतागायत पुन्हा हाती घेण्यात आलेले नाही. त्यानंतर सन २००५ मध्ये पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या व्याघ्रेश्वर टेकडी परिसरातही पुरातत्व विभागाने उत्खनन केले.अनेक दिवस चाललेल्या या उत्खननादरम्यान भल्यामोठ्या महालसदृष वास्तूची तटबंदी आढळून आली होती. यासह १.२५ मीटर जाडी व २० मीटर रुंद भिंतीचा भाग आढळला. ज्याचे पश्चिम दिशेला १७; तर पुर्वेकडे ११ थर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले होते.या भिंतीखाली पुन्हा दगडाचे थर देखील पुरातत्व विभागाला आढळले. पांढºया मातीसोबतच मृद भांडी देखील या उत्खननातून बाहेर आली होती. तथापि, हे काम सलग सुरू राहिले असते तर व्याघ्रटेकडी परिसरातील भुगर्भाच्या खाली दडलेल्या अनेक रहस्यांचा शोध लागणे शक्य झाले असते. मात्र, राज्यशासनाकडून मंजूर निधी आणि कामांसाठी लागणाºया पैशांचा मेळ बसविणे पुरातत्व विभागाला अशक्य झाल्याने आधीच्या दोन उत्खननाप्रमाणेच व्याघ्रटेकडी परिसरातील उत्खननही अर्धवट स्थितीत बंद करण्यात आले. तथापि, सन २००५ पासून आजतागायत ते पुन्हा सुरू व्हावे, याकडे विद्यमान लोकप्रतिनिधी अथवा जिल्हा प्रशासनानेही लक्ष पुरविले नाही. त्यामुळे हा प्रश्न ‘जैसे थे’ आहे.केंद्र शासनाकडून वाढीव निधी मिळविण्यासाठी प्रयत्न अपुरे!महाराष्ट्रात कुठेही पुरातत्व विभागाकडून केल्या जाणाºया उत्खननासाठी राज्यशासनाकडून मंजूर होणाºया निधीचे प्रमाण तुलनेने फारच अल्प आहे. त्यामुळेच वाशिम शहरातील व्याघेश्वर टेकडी परिसर, चामुंडादेवी मंदिर परिसर आणि लालटेकडी भाग या तीनठिकाणी झालेले उत्खनन अर्धवट अवस्थेत बंद पडले. केंद्रशासनाकडे वाढीव निधी मंजूर करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाले असते तर कदाचित हा प्रश्न मार्गी लागला असता. यायोगे पुढचे उत्खनन शक्य झाले असते. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत कुठलाच पुढाकार घेतला नसल्याचा सूर जाणकारांमधून उमटत आहे.भुगर्भात दडलेल्या ऐतिहासिक, पौराणिक तथा प्राचीन अवशेषांसंबंधी नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी वाशिम शहरात अर्धवट अवस्थेत बंद पडलेली तीनही ठिकाणची उत्खननाची कामे पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल. राज्यशासन, केंद्रशासनाकडून या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून घेण्यासाठीही जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार केला जाईल.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण