लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. मुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतमालास अपेक्षीत भाव मिळेनासे झाले आहेत. शिवाय काही मालाची खरेदी करण्यास व्यापारी तयार होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा आॅगस्टच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडला. त्यातच आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळला. या पावसामुळे खरीपातील पिकांना प्रामुख्याने मुग, उडिद आणि सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतमालाचा दर्जाही खालावला आहे. खरीपातील सर्वात कमी कालावधीची पिके असलेल्या मुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शासनाने घोषीत केलेल्या हमीभावापेक्षा खूप कमी भाव शेतकºयांना मिळू लागले आहेत. त्यातच काही शेतमालाचा दर्जा एवढा खालावला आहे की, व्यापारी त्या शेतमालाची खरेदी करण्यासही तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगरुळपीर बाजार समितीत बुधवारी असा प्रकार पाहायला मिळाला. या बाजार समितीत एका शेतकºयाने लिलावात दोन ते अडीच क्विंटल मुग टाकला होता. मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसल्याने या मुगाचा रंग उडून चक्क धुरकट झाला होता. दूरून पाहिल्यास वाळूचा ढीगच आहे, असे वाटत होते. त्यामुळे या मुगाचा लिलावच होऊ शकला नसून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता हा मुग फेकून देणे किंवा गुराला चारणे, एवढाच पर्याय शेतकºयापुढे उरला आहे.
आॅगस्टमधील अतिपावसाचा फटका; शेतमालाचा दर्जा खालावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 3:32 PM
वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.
ठळक मुद्देमुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतमालास अपेक्षीत भाव मिळेनासे झाले आहेत.खरेदी करण्यास व्यापारी तयार होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.