लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होण्यासोबतच रहदारीलाही अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या सुटणे कठीण झाल्याचे दिसून येत आहे.रिसोड येथील बससथानक परिसरातून ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांसह आॅटो मन मानेल तशा पद्धतीने उभे केले जातात. त्यातच हॉटेल्स, पानटपºया, सलूनची दुकाने अगदी रस्त्याला भिडून थाटल्या गेल्याने एस.टी. बस आगारात प्रवेश करताना आणि बाहेर निघताना मोठी अडचण निर्माण होते. याशिवाय शहरातील सर्वच मुख्य चौक आणि रस्त्यांनाही अतिक्रमणाने आपल्या कवेत घेतले असून रस्त्यावरून वाहन चालविणाºया नागरिकांसह पादचाºयांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष पुरविण्याची मागणी अनेकवेळा नगर परिषदेकडे करण्यात आली. मात्र, प्रशासनाने कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे नागरिकांमधून प्रशासनाप्रती संताप व्यक्त होत आहे.
निवडणूकीत उतरलेल्या सत्ताधाºयांना द्यावा लागणार जाब!रिसोड नगर परिषदेची निवडणूक येत्या ९ डिसेंबरला होत असून त्यात उमेदवार म्हणून पुन्हा एकवेळ उतरलेल्या सत्ताधारी नगरसेवकांना शहरांतर्गत वाढलेल्या अतिक्रमणासंबंधी आणि बोकाळलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत मतदारांकडून उपस्थित केल्या जाणाºया प्रश्नांचा जाब द्यावा लागणार आहे. अन्य स्वरूपातील विकासाच्या मुद्यांसह अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणाºया इच्छुक उमेदवारांची यामुळे गोची होणार असल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.