तालुक्यातील ख्यातीकीर्त तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील एकूण ८४ लोकांना घरकुल मंजूर झालेले असून एक लाख रुपयांपेक्षा अधिक निधी या घरकुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून मिळणे अपेक्षित असते.
शासकीय नियम व अटींचे अधीन राहून पोहरादेवी येथील ब यादीतील पात्र नागरिकांना घरे बांधण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता दोन महिन्यांपूर्वी मिळाल्यावर नागरिकांनी आपली कुडामातीची घरे पाडून पक्के घर बांधण्यासाठी पाया खणून ठेवलेला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी पोहरादेवी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपिटीचा आसमानी मार ह्या घरे पाडून पाया आणलेल्या घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांना सहन करावा लागला.
मार्च महिना संपण्याच्या मार्गावर असून यापुढे प्रखर ऊन तापणार असल्याने संबंधित घरकुलांच्या पात्र लाभार्थ्यांना विनाविलंब घरकुल बांधकामासाठी अडलेली पुढील निधी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश महाराज तथा घरकुलाचे लाभार्थी पुरुषोत्तम लक्ष्मण पर्धने आणि मधुकर रंगराव राठोड यांनी केली आहे.तांत्रिक अडचणीमुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची निधी थांबलेला असून शक्य तेवढ्या लवकर लाभार्थ्यांना उर्वरित निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे पाेहरादेवी येथील ग्रामपंचायत सरपंचानी सांगितले.